गुरूवार, 30 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (16:04 IST)

तोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ नका :फडणवीस

ओबीसींच्या हक्काच राजकीय आरक्षण परत मिळत नाही, तोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ नका, असे मत भाजपने सर्वपक्षीय बैठकीत मांडले.ओबीसींचे राजकीय आरक्षण हे त्यांच्या हक्काचे आहे. त्यामुळेच इतर निवडणूका ज्या पद्धतीने लांबणीवर टाकलेल्या आहेत, त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकाही ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत घेऊ नका अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी केली. सर्वपक्षीय बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
 
शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत सरकारने कुठलाही प्रस्ताव ठेवलेला नाही.सरकारने आमची मत जाणून घेतली. के कृष्णमूर्ती आणि खानविलकर जजमेंटमध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे,की राजकीय मागासलेपणाबाबतची एम्पिरिकल डेटाची चौकशी करायची आहे. याचा जनगणनेशी कोणताही संबंध नाहीए.तो परिच्छेद मी आजच्या बैठकीत वाचून दाखवला आहे.आरक्षणाच्या मुद्द्यावर तिहेरी चाचणी यामध्ये अपेक्षित आहे.त्यापैकीचा पहिला भाग आपण समिती नेमून पुर्ण केला आहे. दुसरा भाग म्हणजे राजकीय मागासलेपणाची चौकशी करण्याचे काम हे कमिशनला करायचे आहे. तिसरी चाचणी ही ५० टक्क्यांची आहे. जोवर कमिशन इन्पेरिकल डेटा तयार करत नाही, तोवर हे आरक्षण परत येणार नाही. हे जजमेंटच्या आधारावर सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाचे २०१९ सालचे कर्नाटकचे चंद्रचूड साहेबांचे जजमेंट मी वाचून दाखववले आहे. एम्पिरिकल डेटा सर्वेक्षण करून तयार केला, तर त्याच्या सविस्तर चौकशीत जाण्याचा कोर्टाला अधिकार नाही,असे स्पष्टपणे म्हटले आहे. २०२१ मध्येही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.आपण मराठा आरक्षणाच्यावेळी पाच समित्यांच्या माध्यमातून एम्पेरिकल डेटा तयार केला. तशाच प्रकारचा डेटा तीन ते चार महिन्यात तयार केला जाऊ शकतो. अशा प्रकारेच ओबीसीचे आरक्षण हे निवडणूकांच्या आधी परत करू शकतो.