मंगळवार, 11 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (08:21 IST)

नाशिक हॉटेल येथील खून प्रकरण : संशयिताचा कारागृहात मृत्यू

Nashik Hotel murder case: Suspect dies in jail Maharashtra News Regional News In Marathi Webdunia Marathi
नवीन नाशिक येथील हॉटेल सोनाली मटण भाकरी येथे किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून नाशिकरोडच्या युवकाचा खून प्रकरणातील संशयित आरोपी अतुल सुभाष पिठेकर (१९) याचा हदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांनी दिली.नवीन नाशिकमधील स्टेट बँकेजवळील हॉटेल सोनाली येथे २८ जुलै रोजी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास प्रसाद भालेराव(२५,रा.राजवाडा,देवळालीगाव) हा मित्रांसमवेत जेवण करायला गेला होता.यावेळी अनिल पिठेकर,नीलेश दांडेकर(रा. इंदिरा गांधी वसाहत,लेखानागर) यांच्यासोबत प्रसादचा किरकोळ कारणावरून वाद झाला.
 
याचा राग मनात धरून पिटेकर व दांडेकर यांच्यासह चार-पाच युवकांनी हॉटेलबाहेर शनी मंदिरासमोर प्रसादला मा’रहा’ण करत त्याच्या डोक्यात फरशी टाकून त्याला गं’भीर जखमी केले.त्याला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.याप्रकरणातील सर्व संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान यातील संशयित आरोपी अतुल सुभाष पीठेकर हा मध्यवर्ती कारागृहात अटकेत होता.
 
अतुलची अचानक तब्येत बिघडली. तातडीने कारागृहातील रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले.कारागृह रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अबिद अबू अत्तर यांनी पिठेकर यास मृत घोषित केले.याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक गणेश न्याहाळदे हे तपास करीत आहे.