शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (16:33 IST)

दानवे यांच्यावर महाराष्ट्र काँग्रेसने जोरदार पलटवार, म्हणे अरे बाप्पा सिस्टर हळू!”

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे  यांच्यावर महाराष्ट्र काँग्रेसने जोरदार पलटवार केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने रावसाहेब दानवे यांचा लस घेतानाचा फोटो शेअर करुन खिल्ली उडवली आहे.काही दिवसांपूर्वी रावसाहेब दानवे यांची काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडताना गांधी यांचा उल्लेख देवासाठी सोडलेला वळू किंवा सांड असा केला होता.
 
दरम्यान, यावरुन चौफेर टीका झाल्यानंतर दानवेंची स्पष्टीकरण देताना पुन्हा एकदा जीभ घसरली.एवढंच नव्हे तर राहुल गांधींना बैलाची उपमा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील नकळत बैल बोलून गेले.राहुल गांधी हे सांड बैल काम न करणारे.बैलाचे दोन प्रकार असतात, काम करणारा बैल आणि न काम करणारा बैल.सांड बैल म्हणजे न काम करणारा.सांडचा अर्थ यांनी जो कोणताही घेतला असेल आणि त्याचा जर विपर्यास केला असेल,तर मला असं वाटतं की आपलं अपयश झाकण्यासाठी कुणावर तरी खापर फोडणं हा काँग्रेसवाल्यांचा जुना धंदा आहे,असं दानवे म्हणाले.
 
दानवेंच्या स्पष्टीकरणानंतर आता काँग्रेसने जोरदार उत्तर दिलं आहे.काँग्रेसने रावसाहेब दानवे यांचा लस घेतानाचा फोटो शेअर केला आहे.यामध्ये काँग्रेसने “ज्या लोकांना साधी सुई देखील सहन होत नाही,ते देशासाठी छातीवर गोळ्या व बॉम्ब घेऊन अमर झालेल्या परिवारावर बोलतात.अरे बाप्पा सिस्टर.हळू!” असं लिहून दानवेंवर जोरदार निशाणा साधला आहे.