शुक्रवार, 12 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (15:55 IST)

जवळ बोलवेन आणि ओळख करुन देईन असे म्हणत राणेंचे राऊत यांना चोख उत्तर

Rane replied to Raut saying that he would call him and introduce him Maharashtra News Regional News In Marathi
कोण नारायण राणे असा सवाल करणाऱ्या शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रोखठोक उत्तर दिलं आहे.राणे यांनी गुरुवारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन केलं.यानंतर शिवसैनिकांनी शुद्धीकरण केलं. यावर राऊत यांनी प्रतिक्रिया देताना शुक्रवारी कोण नारायण राणे? या घटनेबद्दल मला माहित नाही, असं सांगितलं.
 
संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर नारायण राणे यांनी रोखठोक उत्तर दिलं आहे.“मी ओळख करुन देईन, जवळ बोलवेन आणि ओळख करुन देईन” असं नारायण राणे म्हणाले.नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा आज दुसरा दिवस आहे.ही यात्रा सुरू करताना आज राणेंनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी त्यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला.

नारायण राणे यांच्या जन आशीर्वादबयात्रेच्या पार्श्वभूमीवर मुंबई मध्ये १९ गुन्हे दाखल झाले आहेत.यावर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया देताना “कितीही गुन्हे दाखल झाले तरी चालतील, मी समर्थ आहे.ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांच्या पाठीशी आहे,”असं राणे म्हणाले.“सूडबुद्धीने गुन्हे दाखल करताय तर लक्षात ठेवा आम्ही वर केंद्रात आहोत, तुम्ही खाली आहात,”अशा करकरा इशारा दिला.“शिवसेनेने कार्यक्रम रद्द केलेलं त्याला आम्ही काय करू. शिवसेना मार्गदर्शक आहे का? शिवसेना कशी वागते हे मला माहिती आहे. मला हे सांगायला वेळ आणू नका,” असा इशारा देखील त्यांनी शिवसेनेला दिला.