शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (15:48 IST)

मी हे पत्र स्विकारत नाही म्हणत संभाजीराजे यांनी १५ पानी पत्र फाडले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत काय करत आहोत, याबाबतचे पत्र संभाजीराजे छत्रपती यांना दिले आहे. एकुण १५ पानी हे पत्र आहे. पण या पत्राच्या निमित्ताने संभाजी राजे यांनी सरकारला लक्ष्य केले हे पत्र नांदेडच्या पालकमंत्र्यांनी दिले असते तर अधिक आनंद झाला असता,असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. त्यावेळी कार्यकत्र्यांनी यासाठीची प्रतिक्रिया म्हणून मुख्यमंत्र्यांचे पत्र फाडले.मी हे पत्र स्विकारत नाही, असेही संभाजीराजेंनी स्पष्ट केले नांदेडमध्ये पालकमंत्री सभेला हजेरी लावण अपेक्षित होते. ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री असले तरीही मराठा आरक्षण उपसमितीचे ते अध्यक्ष आहेत.म्हणूनच त्यांची हजेरी आजच्या सभेला अपेक्षित होती. मराठा समाजाला सामाजिक आर्थिक मागास ठरवण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांनी घ्यायला हवी होती. पण आज ते कुठेही दिसत नाहीत, असाही चिमटा त्यांनी काढला. मराठा समाजाच्या मुक आंदोलनानिमित्ताने ते नांदेडमध्ये बोलत होते. कोल्हापूरच्या सभेला अशोक चव्हाणांच्या गैरहजेरीवरही त्यांनी टीका केली.
 
मुख्यमंत्र्यांचे पत्र फाडण्याच्या प्रतिक्रियेवर मात्र त्यांनी टीका केली.मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आहे. त्यामुळे बेशिस्त खपवली जाणार नाही.मी स्वतः कोणतेही काम बेशिस्तपणे करत नाही,अशा शब्दात त्यांनी पत्र फाडण्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली. मी मुख्यमंत्र्यांनी दिलेले पत्र स्विकारत नाही.मराठा समाजासाठी काय करतोय हे त्यांनी लिहिलय.पण पत्रामध्ये अनेक तफावती असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळेच मी या पत्राचा स्विकारत नसल्याचेही ते म्हणाले.मुख्यमंत्र्यांना पत्र द्यायचे होते, तर ते पालकमंत्र्यांच्या हस्ते द्यायचे होते, असेही त्यांनी सांगितले.