1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (08:41 IST)

शिवसेना यूपीएत सामील होणार?

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आणि संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात UPA च्या चेअरपर्सन सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची बैठक होणार आहे.20 ऑगस्ट अर्थात आज संध्याकाळी 4 वाजता ही बैठक होणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठकीत दूरदृष्यप्रणाली अर्थात ऑनलाईन (Online) माध्यमांद्वारे होणार असल्याची माहिती मिळतेय.

या बैठकीला 4 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतेय.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ,तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहतील अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.