बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (21:46 IST)

सत्तेच्या लालसेपोटी सलगी करणाऱ्या शिवसेनेच्याच शुद्धीकरणाची गरज

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊन जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचं दर्शन नारायण राणेंनी घेतल्यामुळे शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं. सत्तेच्या लालसेपोटी सलगी करणाऱ्या शिवसेनेच्याच शुद्धीकरणाची गरज असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरेंना जेलमध्ये टाकणाऱ्यांसोबत सत्तेची सलगी केली आहे. यामुळे शिवसेनेने  बाळासाहेबांच्या विचारानं शुद्धीकरण करावं असा सल्लाही आशिष शेलार यांनी दिला आहे.
 
भाजप नेते आशिष शेलार यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळांच्या शुद्धीकरणारवरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. शिवसेनेला शुद्धीकरण करण्याच्या कार्यक्रमासाठी सुद्धा अस्तित्व आणि अधिष्ठाण आहे का? हा प्रश्न आहे. याचं कारण सत्तेच्या लालसेपोटी सोनिया गांधींच्या नावाने शपथ घेऊन काँग्रेस बरोबर लसगी केली त्या शिवसेनेची मुळात शुद्धीकरण करण्याची जनतेची मागणी असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
 
आशिष शेलार यांनी पुढे म्हटलं आहे की, स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जेलमध्ये टाकलेल्या छगन भुजबळांबरोबर सत्तेच्या लालसेपोटी सलगी करणाऱ्या शिवसेनेचीच शुद्धीकरण करण्याची गरज झाली आहे. यामुळे शिवसेनेने या शुद्धीकरणाच्या कार्यक्रमाची नौटंकी करु नये स्वतःच्या पक्षाचे शुद्धीकरण बाळासाहेबांच्या विचारांच्या नावाने प्रेरणेने करुन घ्यावे असा सल्लाही आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे.