1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. nashik jail

चार तुरुंग अधिकारी निलंबित

nashik jail
नाशिक मध्यवर्ती तुरुंगात कारागृहाच्या विशेष पथकाने अचानक झडती घेतली असता, या झडतील पुन्हा आठ मोबाईल आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.त्यावर सरकारने कारवाई करत चार तुरुंग अधिकारी निलंबित केले आहे.या ठिकाणी राज्य आणि देशातील अनेक मोठे अट्टल गुंड आहेत.महासंचालकांच्या आदेशानुसार मध्यवर्ती कारागृहात उपअधीक्षक प्रमोद वाघ, वरिष्ठ तुरूंग अधिकारी प्रदीपकुमार बाबर, कैलास मुसमारे, ज्ञानेश्वर चव्हाण, आठ तुरूंगरक्षक व चार होमगार्ड यांच्या पथकाने कारागृहात अचानक तपासणी केली आहे. यामध्ये तुरुंगातील असलेल्या  मंडल क्र. 7, सर्कल क्र. 6 व बॅरेक क्र. 4 च्या जवळ असलेल्या स्वच्छतागृहाच्या भिंतीशी दरवाजाजवळील टाईल्स काढून त्यामध्ये तीन मोबाईल असल्याचे आढळलेआहेत.
 
 बॅरेकच्या छतातील लाकडाच्या पाठीमागे प्लॅस्टिकच्या पिशवीत लपवून ठेवलेले दोन मोबाईल आढळले आहेत . मंडल क्र. 7, सर्कल क्र. 7 व बॅरेक क्र. 2 च्या शौचालयाच्या भांड्याजवळ दोन मोबाईल व परिसरातील शौचालयाजवळ एक असे एकूण आठ मोबाईल आढळून आले होते. त्यामुळे तुरुंग सुरक्षा धोक्यात आली होती. 
 
पुढील लेख
शिववडा गाडीचे अतिक्रमण अधिकाऱ्याला फासले काळे