बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 जुलै 2022 (21:13 IST)

आईनेच पोटच्या मनोरुग्ण मुलाची सुपारी देऊन केली हत्या

murder
मनोरुग्ण असलेल्या मुलाचा त्रास असह्य झाल्याने आईनेच पोटच्या मुलाची पंधरा हजार रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचा प्रकार नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील ढेकू येथे घडली. हत्येची सुपारी घेणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या जनार्दन अप्पा पेंढारे (४५) याची आई जन्याबाई पेंढारे यांनी मुलाची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. हत्येची सुपारी घेणारा संशयित समाधान दौलत भड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत जन्याबाई यांनी पोलिसांत दिलेल्या जबाबानुसार मुलाला फिट येत असल्याने व मुलगा मनोरुग्ण असल्याने गावात राहणाऱ्या समाधान भड याला मुलाला मारण्यासाठी पंधरा हजार रुपये दिले.ठरल्याप्रमाणे भड याने गुरुवारी दुपारी मुलगा जनार्दन याच्या डोक्यात पहारीने घाव घालत ठार मारले. मृतदेह प्लास्टिकमध्ये  गुंडाळून साईनाथ राठोड यांच्या शेतात फेकून दिला होता.