गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 ऑगस्ट 2023 (11:45 IST)

Nashik: भाजी विक्रेत्याची धारदार शस्त्राने हत्या

murder
नाशिक मध्ये लेखानगर शॉपिंग सेंटर येथे एका भाजी विक्रेत्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. संदीप आठवले असे या मयत भाजी विक्रेत्याचे नाव आहे. चार ते पाच जणांनी संदीपच्या पोटात, मानेवर, छातीत धारदार शस्त्राने वार केला त्यात संदीपचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. सदर घटना भरदिवसात घडली असून आरोपी वार करून पसार झाले. ही घटना सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झाली आहे.

या हल्ल्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. भर दिवसांत हल्लेखोरांनी संदीपवर धारदार शस्त्राने 25  वार केले त्यात संदीपचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज वरून अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास लावत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
 Edited by - Priya Dixit