शनिवार, 13 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 मे 2023 (08:06 IST)

नाशिक : बीसीसीआयच्या एनसीए स्पर्धेसाठी नाशिकच्या शाल्मली क्षत्रियची निवड

नाशिकच्या शाल्मली क्षत्रियची , मुलींच्या १९ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
एन.सी.ए अंतर्गत हि स्पर्धा २१ ते ३१ मे दरम्यान राजकोट येथे होत आहे. अष्टपैलु शाल्मली क्षत्रियची रांची येथील १७ एप्रिल ते ११ मे २०२३ दरम्यान झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील एन.सी.ए शिबिरात निवड झाली होती.
 
माजी कसोटीपटू व्हि.व्हि.एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए, बेंगळुरू तर्फे भारतभरातील उदयोन्मुख , होतकरू खेळाडूंसाठी हे शिबीर झाले. विविध स्पर्धेतील लक्षणीय कामगिरीच्या जोरावर हि निवड होते. शाल्मली बरोबरच महाराष्ट्राच्या आचल आगरवाल व के.एन मुल्ला या दोघींचीही यासाठी निवड झाली आहे.

Edited By - Ratnadeep ranshoor