रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 14 जून 2022 (08:00 IST)

संजय राऊतांविरोधात NCP नेत्यांची शरद पवारांकडे तक्रार

sanjay raut
अपक्ष आमदारांवर फोडल्याने राष्ट्रवादीचे नेते नाराज झाले आहेत. आज सकाळी सिल्वर ओकमध्ये झालेल्या बैठकीत या आमदारांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे तक्रार केली आहे.
 
संजय राऊत यांच्यामुळे महाविकासआघाडीमध्ये तणाव निर्माण होत असल्याची तक्रारही त्यांनी केली. आमदार देवेंद्र भुयार, संजय मामा शिंदे, श्याम सुंदर शिंदे यांच्याराष्ट्रवादीच्या अपक्ष आमदारांवर अविश्वास दाखवल्याने राष्ट्रवादींच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. राज्यसभेच्या पराभवाचं खापर वर थेट आरोप राऊत यांनी केला. यानंतर तिन्ही आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, नाराज असलेल्या देवेंद्र भुयार यांनी शरद पवार, अजित पवार यांची आज भेट घेतली. विधानपरिषद निवडणूक डोळ्यासमोर असताना संजय राऊत यांच्या वक्तव्याने आमदारांच्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमदारांवर कोणत्या पद्धतीचा परिणाम होऊ शकतो या संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली.