विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतली
नव्याने स्थापित झालेल्या 288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेच्या तीन दिवसीय अधिवेशनात विजयी नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतली. काही नेत्यांनी शपथ घेण्यास नकार दिल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेत्यांनी शपथ घेतली. त्यात जयंत पाटील यांच्या सह तीन सदस्यांनी सोमवारी आज आमदारकीची शपथ घेतली. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पाटील यांनी विधानसभेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शपथ घेतली.
कोल्हापूर जिल्हातील शाहूवाडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे, पुणे जिल्ह्यातील मावळ मतदार संघाचे राष्ट्रवादीचे सुनील शेळके आणि सोलापूर माळशिरस मतदार संघाचे उत्तमराव यांनी देखील आमदारकीची शपथ घेतली. तर शिवसेनेचे विलास भुमरे आणि शिवसेने(उबाठा)चे वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर आणि राष्ट्रवादीचे शेखर निकम यांनी अद्याप शपथ घेतली नाही.
Edited By - Priya Dixit