नीट पेपरफुटी प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ माजवली असून अहिल्यानगर कनेक्शन आता अधिक गडद झाले; न्यायालयाने आरोपी धनंजय लोखंडेला दोन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला
नीट परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी अहिल्यानगर न्यायालयाने आरोपी धनंजय लोखंडेला दोन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला असून, CBI त्याला दिल्लीला घेऊन जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नीट पेपरफुटी प्रकरणात अहिल्यानगर न्यायालयाने आरोपी धनंजय लोखंडेला दोन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला असून सीबीआय अधिक तपास करत आहे.
पेपरफुटी प्रकरणात अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील धनंजय निवृत्ती लोखंडे (वय २६) या आरोपीला अहिल्यानगर न्यायालयाने दोन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. धनंजय लोखंडे याला अहिल्यानगर (राहुरी) येथून अटक करण्यात आली. तो पूर्वी पुण्यात राहत होता आणि पोलिसी कारवाई टाळण्यासाठी अहिल्यानगरकडे गेला होता. तो BAMS (आयुर्वेदिक) पदवीधर आहे आणि आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत होता.
सीबीआयने त्याला ताब्यात घेतले असून, पुढील तपासासाठी दिल्ली किंवा इतर ठिकाणी नेण्यात येणार आहे. या प्रकरणात तो मुख्य आरोपी शुभम खैरनार (नाशिक) याला पेपर पुरवल्याचा संशय आहे. सीबीआय सध्या देशभरात तपास करत आहे आणि महाराष्ट्र पोलिस त्यांना सहकार्य करत आहे.
तसेच पेपरफुटी प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ माजवली असून, महाराष्ट्रातील अहिल्यानगर कनेक्शन आता अधिक गडद झाले आहे. सीबीआय आता लोखंडेला कायदेशीर प्रक्रियेसाठी दिल्लीला नेऊन तिथल्या विशेष न्यायालयात हजर करेल. लोखंडेवर पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये मध्यस्थ म्हणून काम केल्याचा आणि विद्यार्थ्यांकडून मोठी रक्कम जमा केल्याचा संशय आहे.
सीबीआयचा असा संशय आहे की, या पेपरफुटीची पाळेमुळे केवळ महाराष्ट्र किंवा बिहारपुरती मर्यादित नसून ती दिल्ली आणि राजस्थानपर्यंत पसरलेली आहे. सीबीआयने लोखंडेच्या वास्तव्यातून काही डिजिटल उपकरणे, मोबाईल फोन आणि कागदपत्रे जप्त केली आहे. त्यातून या रॅकेटमधील इतर 'मोठ्या माशांची' नावे समोर येण्याची शक्यता आहे.
या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. महाराष्ट्रातील पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी यापूर्वीच निदर्शने केली आहे.
नीट सारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षेतील हा घोटाळा शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. या प्रकरणातील धागेदोरे आता थेट 'दिल्ली' कनेक्शनपर्यंत पोहोचल्याने तपासाला वेग आला आहे.
Edited by-Dhanashri Naik