1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. New buses will be added to Maharashtra's ST fleet

Maharashtra ST New Buses महाराष्ट्रात ५,००० नवीन लालपरी बसेस धावणार

महाराष्ट्राच्या एसटी ताफ्यात ५,००० नवीन लालपरी बसेसची भर पडणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, टाटा मोटर्सने सर्वात कमी बोली लावली आहे. यामुळे जुन्या बसेसवरील ताण कमी होईल.

महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या ताफ्याचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि विश्वसनीय सार्वजनिक वाहतूक पुरवण्यासाठी ५,००० नवीन लालपरी बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून यामुळे एसटीला नवी ताकद मिळेल. परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, टाटा मोटर्सने निविदेत सर्वात कमी किंमत देऊ केली आहे. ते पुढे म्हणाले की, बसेसच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नवीन बसेसच्या आगमनामुळे जुन्या वाहनांवरील ताण कमी होईल, बस सेवेची उपलब्धता वाढेल आणि रस्त्यात बस बंद पडण्याच्या समस्येवर नियंत्रण येईल. पुढील सहा महिन्यांत, ५,००० हून अधिक एसटी बसेस सेवेतून निवृत्त करून काढल्या जातील.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
Hindi Diwas 2026 Wishes in Marathi हिंदी दिवसाच्या शुभेच्छा