बुधवार, 25 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

निवडणुकीसाठी शिवसेनेचे नवे गाणे

शिवसेनेने महापालिका निवडणुकीसाठी आपलं नवं गाणं लॉन्च केलं आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी शिवसेनेच्या या नव्या गाण्याला शिवसैनिकांकडूनही मोठी दाद मिळत आहे.  शिवसेनेचं हे नवं गाणं गीतकार मंदार चोळकर याने लिहलं असून, याला संगीतबद्ध करण्याचं काम स्वप्नील गोडबोले या नव्या दमाच्या संगीतकारानं केलं आहे.

शिवसेनेचं हे नवं गाणं स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांनी गायलं आहे. या गाण्यातूही शिवसैनिकांना लढण्यासाठी आवाहन केलं गेलं आहे. तसेच गेल्यावर्षीच्या शिवसेनेच्या ‘करुन दाखवलं’ या टॅगलाईनला धरुन हे गाणं लिहण्यात आलं आहे.