शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (10:17 IST)

बैलगाडी शर्यतीसाठी नवी नियमावली जाहीर, जाणून घ्या

कोरोनाचे सावट आता राज्यात कमी झाले असून आणि सर्वोच्च न्यायालय आणि राज्यसरकारने परवानगी दिल्याने यंदा सर्वत्र बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे. या शर्यतीसाठी नवीन नियमावली जाहीर केली असून त्यानुसारच बैलगाडी शर्यती(bullock cart race)चे आयोजन करण्यात येतील. या नवीन नियमावलीनुसार, पंधरा दिवस आगोदर शर्यतीसाठी परवानगी घ्यावी लागणार 

बैलाचा छळ करणे त्यांना शर्यतीसाठी उत्तेजक द्रव्य देण्यास मनाई आहे. नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई करून अनामत रक्कम जप्त करण्यात येईल. बैलगाडी शर्यत 1000 मीटर अंतराची असेल. शर्यतीत भाग घेणाऱ्या बैलाचे शारीरिक तंदुरुस्ती प्रमाणपत्र देणे. बैलांचा शर्यतीसाठी छळ  न करणे, बैलांना उत्तेजक द्रव्य न देणे हे सर्व नियम लागू करण्यात आले आहे. नियमांना मोडल्यास कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहेत.