बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (18:21 IST)

आठवडाभरात नवीन‎ कुलगुरू मिळणार‎ : राज्यपालांची माहिती

Bhagat Singh Koshyari
कवयित्री‎ बहिणाबाई चौधरी उत्तर‎ महाराष्ट्र विद्यापीठात येत्या‎ चार ते पाच दिवसांत अंतिम‎ मुलाखती होऊन नवे कुलगुरू‎ मिळतील, अशी माहिती‎ राज्यपाल तथा कुलपती‎ भगतसिंह कोश्यारी यांनी‎ व्यवस्थापन परिषदेला दिली.‎
 
राज्यपाल कोश्यारी सोमवारी‎ विद्यापीठात जलतरण‎ तलावाच्या उद्घाटनासाठी‎ आले होते. त्यापूर्वी त्यांनी‎ विद्यापीठ व्यवस्थापन परिषद‎ सदस्यांशी संवाद साधला.‎ दीपक पाटील यांनी‎ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी‎ वर्षानिमित्त विद्यापीठाकडून‎ राबवण्यात येणाऱ्या‎ कार्यक्रमांची माहिती दिली.‎ जिल्हाधिकारी अभिजित‎ राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य‎ कार्यकारी अधिकारी डॉ.‎ पंकज आशिया, जिल्हा‎ पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे,‎ प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.‎पवार, व्यवस्थापन परिषद‎ सदस्य प्राचार्य आर.एस.‎पाटील, प्राचार्य डॉ.पी.पी.‎छाजेड, प्रा.एस.‎चौधरी, प्राचार्य एल.पी.‎देशमुख, प्राचार्य आर.पी.‎ फालक, प्रा. मोहन पावरा, डॉ.‎ महेश घुगरी उपस्थित होते.‎