पतीनेच केले पत्नीचे अश्लील नको ते फोटो व्हायरल
जळगावच्या पारोळा शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीने आपल्या पत्नीचे अश्लील फोटो व्हायरल केल्याची धक्कादायक घटना घडलीय. याप्रकरणी पीडीत पत्नीच्या फिर्यादीवरून पतीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा शहरातील २० वर्षीय विवाहित महिलेच्या पतीने हे कृत्य केले. संशयिताने अनैसर्गिक कृत्य करण्यास पत्नीला भाग पाडले, तसेच पत्नीचे अश्लील फोटो काढले. पत्नीने या प्रकाराला विरोध केल्यानंतर तिला घरातून बाहेर काढण्याची धमकीही दिली होती. याबाबत २२ रोजी विवाहिचे नातेवाईक विवाहितेला कार्यक्रमासाठी माहेरी घेण्यासाठी आले होते. त्यावेळी सासरच्या मंडळींनी नातेवाईकांशी भांडण करून विवाहितेला व तिच्या नातेवाईकांना घरातून हाकलून लावले.
त्यानंतर दि.२६ व २७ च्या मध्यरात्री संशयिताने पत्नीचे व स्वत:चे फोटो व्हायरल केले. हे फोटो विवाहितेच्या नातेवाईकांनी बघितले व सासरच्या मंडळींना विचारणा केली. त्यावेळी सासरच्या मंडळींनी तुमच्याने जे होईल ते करा, असे सांगितले. त्यामुळे विवाहितेने पतीविरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.