1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 एप्रिल 2023 (22:37 IST)

आमदारांच्या बैठकीच्या बातम्या पूर्णत: असत्य- अजित पवार

ajit pawar
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार काही आमदारांसह भाजपमध्ये  प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आज अचानक अजित पवार यांनी पुण्यातील नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पवर राष्ट्रवादीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.या चर्चांवर आता अजित पवार यांनी ट्विट करुन स्पष्टीकरण दिले आहे.
 
"खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना व उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो, असं ट्विटमध्ये अजित पवार यांनी म्हटले आहे.
 
"सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरु राहणार असल्याचेही पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor