शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (20:46 IST)

व्हिडीओ शेअर करत विनायक राऊतांच्या टीकेला निलेश राणेचे उत्तर

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केल्याने निलेश राणे संतापले आहेत. विनायक राऊत यांनी नारायण राणेंचं शिक्षण काढल्याने निलेश राणे यांनी जिथे दिसणार तिथे फटकावणार अशा शब्दांत इशारा दिला आहे. निलेश राणे यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर करत विनायक राऊतांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
 
“नेहमीप्रमाणे विनायक राऊत भुंकायला बाहेर आले आहेत. सामाजिक कामासाठी विनायक राऊत कधीही बोलणार नाहीत. पण उलटी करायला, घाण करायला नेहमी पुढे असतात. त्यांची स्वत:ची किंमत काय? भाजपाच्या लाटेत दोन वेळा हा माणूस निवडून आला,” असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
 
निलेश राणे यांनी यावेळी विनायक राऊत यांना आव्हान देताना म्हटलं आहे की, “हिंमत नाही हे आम्हाला माहिती आहे, पण हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीला उभे राहा, किती मत मिळतात ते पहा. पण ते हिंमत करणार नाही. आपण लाटेत निवडून आल्याचं त्यांना माहिती आहे”.
 
“खासदारकीचा एकही गुण यांच्यात नाही. सभागृहात तर अब्रूच काढत असतात. धड बोलता येत नाही, विषय माहिती नसतात. मातोश्रीचा चप्पलचोर अशी त्यांची ओळख आहे. हा मातोश्रीचा नवा थापा आहे,” अशा शब्दांत निलेश राणे यांनी विनायक राऊतांवर टीका केली आहे.