मंगळवार, 19 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 ऑगस्ट 2022 (15:39 IST)

गणेशोत्सवानिमित्त नितेश राणेंची मोठी घोषणा

nitesh rane
गेल्या दोन वर्षापासून राज्यासह देशावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना नेहमीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करता आला नाही. मात्र, यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने सरकारने सर्व सणांवरील बंदी उठवली आहे. त्यामुळे सर्वत्र यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात गावी जाणाऱ्या लोकांसाठी भाजपा सरकारकडून विशेष ट्रेन आणि बसेस सोडण्यात येत आहे. दरम्यान, या संदर्भात आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
आमदार नितेश राणे यांनी सांगितले की, “दरवर्षी गणेशोत्सवासाठी निलेश राणे आणि भाजपातर्फे मोदी एक्सप्रेस सोडण्यात येते, ती एक्सप्रेस यावर्षी देखील सोडण्यात येणार आहे. कोकणवासीयांची जेवढी सेवा, भाजपा आणि आमच्याकडून होते आहे, तेवढी दुसरे कोणते पक्ष करत असतील, असं वाटत आहे. सध्या कोकणात बस आणि रेल्वे जातात आहे, भविष्यात विमानांचीही सोय आम्ही करणार असल्याची प्रतिक्रिया यांनी दिली आहे.