मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 (14:50 IST)

नितेश राणे यांची तब्येत बिघडली, कोल्हापूरला नेले जाणार

Nitesh Rane
भाजपचे आमदार नितेश राणे यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना कोल्हापूरला नेले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात त्यांची तपासणी केली जा णार आहे. दुसरीकडे  नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. 
 
नितेश राणे यांच्या छातीत दुखत असल्याची माहिती देण्यात आली. काल रात्री नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर कणकवलीत आणण्यात आले होते. कणकवलीहून ओरोस जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. रक्तदाब वाढल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते.
 
दरम्यान, जिल्हा रुग्णालयात कार्डियाक सिस्टीम उपलब्ध नसल्याने कोल्हापूरमध्ये नेऊन त्यांची तपासणी केली जाणार आहे. यानंतरच उपचार करण्यात येणार आहेत.