गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (21:04 IST)

नितेश राणेंचा जामिनासाठीचा अर्ज मोकळा, उद्या पुन्हा सुनावणी

संतोष परब हल्ला प्रकरणात कणकवली न्यायालयाने नितेश राणे यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांचा जामिनासाठीचा अर्ज मोकळा झाला आहे. त्यामुळे नितेश राणे यांचा जामिन अर्ज आम्ही न्यायालयात दाखल केला असल्याची माहिती राणेंचे वकील सतिश मानेशिंदे आणि संग्राम देसाई यांनी दिली होती. या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.
 
कणकवली न्यायालयाने नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी सुनावताच लगेचच सत्र न्यायालयात जामिनासाठीचा अर्ज दाखल करणार असल्याची माहिती राणेंचे वकील सतिश मानेशिंदे आणि संग्राम देसाई यांनी दिली होती. या अर्जावर आता उद्या म्हणजे ५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असल्याचं अॅड. संग्राम देसाई यांनी म्हटलं आहे.
 
नितेश राणेंची तब्येत आधीपासूनच बरी नव्हती. पण ठरल्याप्रमाणे, न्यायालयाच्या आदेशामुळे ते पोलीस कोठडीत गेले होते. पण आता नियमित तपासणी होईल, त्यात डॉक्टरांना जे आढळून येईल, त्यानुसार पुढची कार्यवाही होईल. आम्ही फक्त न्यायालयात नमूद केलं आहे की त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी आणि डॉक्टरांना उपचाराची गरज वाटली तर उपचार केले जातील. नाही वाटलं तर काही हरकत नाही. न्यायालयाला माहिती द्यायचं आमचं काम होतं, ते आम्ही केलं.