शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (17:00 IST)

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या

यवतमाळ जिल्ह्यातील भांबराजा येथे शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याची राहत्या घरात गुरुवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. सुनील डिरवे असे या मयत झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. सुनील डिरवे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि ग्राम पंचायत सदस्य होते. 
त्यांचा घरात शिरून गुरुवारी रात्री तीन अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या नंतर कुऱ्हाडीने सपासप वार केले.    
सुनील डिरवे यांचे खुनाचे कारण अद्याप कळू शकले नाही. शिवसेनेचे सुनील डिवरे हे स्थनिकांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी परिसरात पसरल्यावर त्यांच्या घराबाहेर गर्दी जमा झाली. डिवरे हे रक्ताने माखलेले होते. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या मृत्यूमुळे सध्या भांबीराजा येथे तणावपूर्ण वातावरण आहे. आरोपीना अटक करण्याची मागणी केली जात आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आले आहे.