शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 डिसेंबर 2022 (15:07 IST)

काँग्रेसचा नेता असूनही नितीन गडकरींनी मला रणजीत देशमुखांच्या कार्यक्रमाला जाण्यास सांगितलं

नाना पाटेकर यांनी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरींचं तोंडभरून कौतुक केलं. “काँग्रेसचा नेता असूनही नितीन गडकरींनी मला रणजीत देशमुखांच्या कार्यक्रमाला जाण्यास सांगितलं,” अशी माहिती नाना पाटेकरांनी दिली. तसेच हे फक्त गडकरीच करू शकतात, असंही नमूद केलं. ते खासदार (संसद) सांस्कृतिक महोत्सव २०२२ च्या उद्घाटन समारंभात बोलत होते.
 
नाना पाटेकर म्हणाले, मी या कार्यक्रमाला उशिरा येण्याचं कारण दुसऱ्या ठिकाणी रणजीत देशमुख यांच्या वडिलांच्या पुतळ्याचं अनावरण होतं. तर नितीन गडकरींनी तो नेता काँग्रेसचा असूनही ती चांगली माणसं आहेत, नाना तुम्ही तिथं जा असं सांगितलं.
 
ठतसेच तो कार्यक्रम करून या, थोडा उशीर झाला तरी चालेल, असंही नमूद केलं. हे फक्त गडकरीच करू शकतात. रणजीत देशमुख वेगळ्या पक्षाचे, काँग्रेसचे असूनही त्यांनी ती खूप चांगली माणसं आहेत असं म्हटलं,” असं नाना पाटेकर यांनी नमूद केलं.
 
Edited by : Ratnadeep Ranshoor