सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 27 नोव्हेंबर 2022 (10:58 IST)

विक्रम गोखलेंसाठी नाना पाटेकरांची भावनिक पोस्ट

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने सिने सृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी बालगंधर्व रंगमंदिर येथे ठेवण्यात आले. त्यांचे अंत्यसंस्कार वैकुंठ धाम स्मशान भूमीत होणार आहे. 
 
विक्रम गोखले यांच्या निधनांनंतर चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली असून नाना पाटेकर यांनी फेसबुकवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले " विक्रम मी कायम तुझ्या समोर नतमस्तक होतो....आणि असें तुझ्या सारखा कलावंत आणि माणूस होणे नाही.. अशी भावनिक पोस्ट त्यांनी लिहिले आहे.  या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपली श्रद्धांजली दिली आहे. त्यांनी विक्रम यांच्या सोबत आपला एक फोटो शेअर केला आहे.  
 
 
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि नाना पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात एकत्र काम केले आहे. नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांचे दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर आले आहे. त्यांनी  केलेल्या पोस्टवर अनेकांनी आपल्या श्रद्धा सुमन वाहिल्या आहेत. 
 
Edited By - Priya Dixit