1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Nitin Gadkaris defamation case to be heard on August 5

E20 controversy नितीन गडकरींच्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी ५ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणार

ई२० पेट्रोल धोरणाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी कथित बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट्स हटवण्याची मागणी करत, ११ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. गडकरींचा दावा आहे की, या पोस्ट्सना ई२० धोरणाशी जोडून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता ई२० पेट्रोल धोरणासंदर्भात सोशल मीडियावर फिरत असलेल्या काही पोस्ट्सवर कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग निवडला आहे. गडकरींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कथित बनावट आणि आक्षेपार्ह पोस्ट्स हटवण्याची मागणी केली आहे. त्यांनी ११ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचीही मागणी केली आहे.
 
गडकरी म्हणतात की, ई२० पेट्रोल धोरणासंदर्भात सोशल मीडियावर त्यांच्याविरुद्ध खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे. अशा प्रकारच्या मजकुराद्वारे त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
 
या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. मागील सुनावणीदरम्यान, काही पक्षांना अद्याप याचिकेच्या प्रती मिळाल्या नसल्याचे न्यायालयाला कळवण्यात आले होते. यानंतर, न्यायालयाने गडकरींना सर्व पक्षांना याचिकेच्या प्रती देण्याचे निर्देश दिले.
गडकरींच्या याचिकेत म्हटले आहे की, त्यांचे नाव आणि छायाचित्रे वापरून अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहे. या पोस्टद्वारे त्यांना थेट ई२० पेट्रोल धोरणाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. गडकरी म्हणतात की, या पोस्ट पूर्णपणे खोट्या, दिशाभूल करणाऱ्या आणि त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणाऱ्या आहे.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
LIVE: आदित्य ठाकरे यांची विद्यार्थ्यांवरील खटले मोफत लढवणार असल्याची मोठी घोषणा