सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (19:46 IST)

राज्यात तूर्त कोणतेही लोडशेडींग नाही, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती

nitin raut
महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या विजेच्या बिलाच्या दुरूस्तीचे प्रश्न हे तातडीने सोडविण्यात येतील. ही वीजबिले तपासून दुरूस्तीच्या सूचना देण्यात येतील अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. राज्यात तूर्त कोणतेही लोडशेडींग नसल्याची माहिती ऊर्जामंत्र्यांनी विधान परिषदेत दिली. मराठवाड्यात रब्बी हंगामात २२० केव्हीचे रोहित्र जळाल्याने तालुक्यातील ४०० विद्युत रोहित्रांवर वीज पुरवठा विस्कळीत झाल्याचा मुद्दा विधान परिषदेचे सदस्य अंबादास दानवे यांनी मांडला होता. त्यावर बोलताना राज्यात लोडशेडिंग नसल्याचे ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या दिवसा वीज पुरवठा करण्याच्या मुद्द्यावर बोलताना सौरकृषीपंप योजना राबवणार असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले. दिवसा वीज पुरवठ्याबाबत नियोजन असून राज्यात तूर्तास तरी कोणतेही लोडशेडिंग होणार नसल्याचे ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले.