शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 नोव्हेंबर 2020 (08:13 IST)

कॉलेज सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय नाही : उदय सामंत

”राज्यात कॉलेज सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. यूजीसीने गाईडलाईन दिली आहे, त्याबाबत सगळ्या कुलगुरुंची बैठक घेऊ”, असं उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले आहेत. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते. 
 
शासनाशी चर्चा करून विद्यापीठाने निर्णय घ्यावा, असं यूजीसीने सांगितलं आहे. दिवाळीनंतर आम्ही बैठक घेऊ, सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही. विद्यापीठ, महाविद्यालयांमधील कोविड परिस्थिती लक्षात घेता यूजीसीनं काही सूचना केल्या आहेत.विद्यार्थ्यांच्या सुरक्षा दृष्टिकोनातून विचार करून निर्णय घेऊ. यूजीसीने पत्र दिलं आहे, त्याचा सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन उदय सामंत यांनी दिलं आहे. 13 विद्यापीठात अपवाद वगळता सगळ्या परीक्षा पार पडल्या आहेत. मुंबईतील 2 लाख 50 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, 2 विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली आहे. पास होण्याची तयारी 93 टक्के आहे. काही विद्यार्थ्यांना कंटेन्मेंट झोन, पूर आणि अन्य कारणाने परीक्षा देता आलेल्या नाहीत. त्यांचीच परीक्षा ही दिवाळीनंतर घेणार असल्याचं सांगितलं आहे.