शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 (10:15 IST)

माथेरानची राणी मिनिट्रेन सुरु, पर्यटकांना दिलासा

Queen of Matheran
माथेरानची राणी मिनिट्रेन आजपासून सुरु होणार आहे. 2 सप्टेंबरला माथेरान सुरू झाल्यानंतर पर्यटक देखील आता माथेरानमध्ये येऊ लागले आहेत. पण अमन लॉज ते माथेरान हे दोन किलोमीटर अंतर पर्यटकांना पायी चालावे गालत होते. त्यामुळे आता पर्यटकांची ही समस्या दूर होणार आहे. मिनिट्रेन सुरू करण्याबाबत पर्यटकांनी आग्रह केला होता. त्यानुसार स्थानिक प्रशासनाने मागणी केल्यानंतर ही मिनिट्रेन शटल सेवा पर्यटकांच्या सेवेसाठी धावणार आहे.
 
पर्यटकांनी मागणी केल्यानंतर येथील नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी मिनिट्रेन सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. पण प्रशासनाने राज्य शासनाची परवानगी आवश्यक असल्याचे सांगितले. राज्य सरकारने मिनिट्रेन सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिला. त्यानंतर आता तब्बल आठ महिन्यांनी माथेरान-अमन लॉज मिनिट्रेन 3 द्वितीय श्रेणी, 1 प्रथम श्रेणी आणि 2 मालवाहू बोगीसह पर्यटकांच्या सेवेसाठी धावणार आहे.
 
मिनिट्रेनचे वेळापत्रक:
 
माथेरान ते अमन लॉज : सकाळी 9:30 आणि सायंकाळी 4 वाजता
अमन लॉज ते माथेरान : सकाळी 9:55 आणि सायंकाळी 4:25