रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 (17:32 IST)

चंद्रकात पाटील यांनी अनेक बाबतीत मला त्रास दिला : हसन मुश्रीफ

कोल्हापूर जिल्हा बँकेप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी त्रास दिलाय. इन्कम टॅक्स, ईडीची धाड टाकली आहे. ते कटकारस्थान करत आहेत. चंद्रकात पाटील यांनी अनेक बाबतीत मला त्रास दिला आहे. साधा भोळा स्वभाव आणि विरोधकांचा काटा काढायचा असे दोन स्वभाव त्यांचे आहेत. असं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणालेत. 
 
चंद्रकांत पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही व त्यांना कोल्हापूरमधून निवडून न आल्याबद्दल आम्ही टीकाही केली नव्हती, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. चंद्रकांत पाटलांनी राज्यपाल नियुक्त विधानसभेच्या बारा जागासंदर्भातील माझ्या वक्तव्याला पुष्टीच दिली आहे, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
 
मंत्री मुश्रीफ यांनी या पत्रकात पुढे म्हटले आहे, विधानसभेच्या निवडणुका होऊन एक वर्ष झालेले आहे, विधानसभा निवडणुकीला अजून चार वर्षे शिल्लक आहेत. भाजपचा एकही आमदार कोल्हापूरमध्ये निवडून आलेला नाही, त्यामुळे राजीनामा कोण देणार ? कशासाठी? हे होणार नाही, हे चंद्रकांत पाटील यांना माहित आहे. तसेच ज्या कोथरुडमधून आपण आमच्या मेघा कुलकर्णी ताईंना डावलून निवडून आला आहात, तिथे भाजप पक्षही परवानगी कशी देईल?  दोन्हींही गोष्टी केवळ अशक्य आहेत. त्यामुळे पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आम्हांला तुमची येथेच गरज आहे.