शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 मे 2023 (21:20 IST)

कितीही वेळा पाटील यांची चौकशी केली तरी काहीही निष्पन्न होणार नाही : भुजबळ

chagan bhujbal
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरून राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी यावरून आंदोलनं केली जात आहेत.  यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली आहे. जयंत पाटील यांनी काही चुकीचे केले नाही. त्यांच्यावर कारवाई होणार नाही. त्यामुळे कितीही वेळा त्यांची चौकशी केली तरी काहीही निष्पन्न होणार नाही असा टोला ईडीच्या मागून भाजपला लगावला आहे. तर भाजपचे नेतेच म्हणतात, त्यांच्याकडे माणसं धुवायची लाँड्री अन् पॉवडर आहे. ती गुजरातवरून येते. मग ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना त्या लाँड्रीमध्ये टाकलं जात पावडर टाकली जाते आणि स्वच्छ केलं जात.  छगन भुजबळ सोमवारी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
 
भुजबळ म्हणाले, की आता केंद्र सरकार ईडी, सीबीआय हे जाणून बुजून काही विशिष्ट राजकीय नेते आणि त्यानंतर अधिकार्‍यांना त्रास देण्याचा प्रकार करीत आहे; परंतु आता हेच खूप दिवस चालणार नाही सुरुवातीला हा प्रयोग माझ्यावरही झाला होता; पण त्यावेळी गांभीर्याने घेतले गेले नाही, म्हणून हे वाढत गेल्याचे त्यांनी सांगितले.
 
यावेळी भुजबळ पुढे म्हणाले, की महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचे  निवडणुकीचे सूत्र निश्‍चित झालेले नाही. मात्र आमचे सर्व नेते एकत्र बसतील आणि ते सूत्र निश्‍चित करतील; परंतु याबाबत चे आराखडे बांधले जात आहेत, ज्या अफवा पसरला जात आहेत, त्या अतिशय मनोरंजक असल्याच्या सांगून भुजबळ म्हणाले, की आम्ही एक निकष सर्वत्र लावणार आहे तो म्हणजे ज्या पक्षाला विजयी होण्याची जास्तीतजास्त संधी आहे, त्या पक्षाला ती जागा दिली पाहिजे, यासाठी लवकरच पक्षाचे धोरण महाविकास आघाडी ठरवेल.
 
त्र्यंबकेश्वर  मंदिर वाद प्रकरणावर  छगन भुजबळ म्हणाले की, त्र्यंबकेश्वरचे गावकरी, नगरपालिकेचे काही म्हणणं नाही. पुजारी लोक सांगतात की, शेकडो वर्षाची परंपरा आहे. देवाचे ऋण फेडण्यासाठी धूप दाखवतात, पूजा होते. याच मंदिरात एका चित्रपटाची शूटिंग झाली, या चित्रपटात अभिनेत्री म्हणून पार्वती खान काम करत होती. ही अभिनेत्री मंदिरात जाऊन चित्रीकरण करण्यात आले होते, मग आता असे का होते? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor