सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 डिसेंबर 2019 (15:44 IST)

आता दहावी बारावीत कोणीच नापास होणार नाही, राज्य सरकारचा निर्णय

दहावी व बारावीच्या गुणपत्रिकेवर आता ‘नापास’ किंवा ‘अनुत्तीर्ण’ शेरा असणार नाही. कारण नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर आता ‘कौशल्य विकासास पात्र’ असा शेरा देण्यात येणार आहे. यापूर्वी हा निर्णय फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मर्यादित ठेवला होता, मात्र आता महाराष्ट्र शासनाने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.
 
शासनाने काढलेल्या निर्णयानुसार, इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण देणारा एक मोठा टप्पा आहे. या महत्वाच्या  टप्प्यावर अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना भविष्याच्या वाटचालीत अडथळे येतात, अशा तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि स्वत:च्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण व्हावी यासाठी दहावी आणि बारावी उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांकरिता कौशल्य सेतू कार्यक्रम योजना राबवली जाणार  आहे. त्यामुळे आता बारावीत कोणीही नापास होणार नाही, त्यामुळे मुलांना येणारे नैराश्य आणि चुकीच्या भावनेतून घेतला जाणारा कोणताही निर्णय थांबवता येणार आहे.