बुधवार, 22 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 जून 2021 (11:21 IST)

OBC आरक्षण मोर्चा, प्रवीण दरेकर पोलिसांच्या ताब्यात

OBC Reservation Morcha
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात 1 हजार ठिकाणी भाजपकडून 26 जून अर्थात आज शनिवारी जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय. तर भाजपच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर आता काँग्रेसनंही 26 जून रोजी आंदोलनाची घोषणा केली. काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घोषित केलंय.
 
भाजपाने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन करत आहे. ठाण्यात देखील भाजपातर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. पण आंदोलन सुरू होण्याआधीच भाजपचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर ज्ञानसाधना कॉलेजजवळ भाजपच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान, अहमदनगरमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप अधिकच आक्रमक झाले असून राज्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत.