पुरात अडकलेल्या प्रवाशांचे जवानाने प्राण वाचविले
सध्या राज्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे नदी नाले दुधडी भरून वाहत आहे. चंद्रपूर जिह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले तुडूंब भरले आहेत. चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यात प्रवाशांनी भरलेली टाटा मॅजिक गाडी वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.भद्रावती तालुक्यात पुरात वाहून जाणाऱ्या प्रवाशांना जवानाने आणि गावकऱ्यांनी वाचविले आहे. टाकळी-पानवडाळा दरम्यान नाल्यात पूर आला आहे. तरी ही नागरिक आपल्या जीवाची प्रवण करता यातून वाहनांनी येजा करत आहे. टाकळी-पानवडाळा नाल्यातून प्रवाशांनी भरलेली टाटा मॅजिक वाहून गेली या मध्ये 5 प्रवाशी होते. वाहन पुरात वाहत असल्याचे लक्षात घेत प्रवाशांनी मॅजिकच्या टपावर चढून स्वतःचे प्राण वाचविले. प्रवाशांना संकटामध्ये अडकलेलं पाहून गावातील सैन्यातील जवान निखिल काळे याने प्रसंगावधान राखून घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने प्रवाशांचे प्राण वाचविले. निखिल काळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता गाडीतील सर्व प्रवाशांना वाचवले.त्याने केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.