गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 नोव्हेंबर 2018 (16:25 IST)

विठूरायाला तब्बल ७३ तोळ्याचा हार अर्पण

Offering 73 tolas of gold
पंढरपुरातल्या विठूरायाच्या चरणी बंगळुरूतल्या विठ्ठलभक्तानं ३७ लाखांचा सोन्याचा चंद्रहार अर्पण केलाय. तब्बल ७३ तोळ्याचा हा हार असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीनं दिलीय. बंगळुरूतले विठ्ठल भक्त असलेले एन. जी. राघवेंद्र आणि बिपीन जलाणी यांनी हा चंद्रहार अर्पण केलाय. या चंद्रहारावर लक्ष्मीची सुंदर प्रतिमा आहे.
 
त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं विठूरायाच्या गळ्यात हा हार घालण्यात आलाय. त्यामुळे चंद्रहार गळा कासे पितांबर असं मनमोहक विठ्ठलाचं रूप पाहण्याचा योग भाविकांना आला.