गुरूवार, 20 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 फेब्रुवारी 2023 (16:09 IST)

अधिकाऱ्याची गुंडागर्दी व्हायरल

crime
बीडचा धारूर पंचायत समितीच्या मुजोर अभियंत्याने गुंडालाही लाजवेल अशी धमकी दिली आहे. जो येईल त्याला जेसीबीच्या खोऱ्याखाली घ्या, अशी धमकी त्यांनी दिली आहे. रस्त्याचे काम चांगले करा म्हणण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांना त्यांनी ही धमकी दिली. याप्रकरणी अभियंत्याकडे पिस्तूल धाक दाखवल्याची तक्रारही गावकऱ्याने केली आहे.
 
जेसीबीच्या खोऱ्या खाली घे त्यांना पुरून टाक, अशी धमकी गावकऱ्यांना देणाऱ्या शासकीय अभियंत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बीडमधील या मुजोर अभियंताच्या धमकीमुळे गावकरी दहशतीखाली आहेत. एखाद्या टपोऱ्या गुंडालाही लाजवेल, अशी धमकी चक्क धारूर पंचायत समितीच्या अभियंत्याने दिली आहे.