शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (09:17 IST)

दादा भुसेंनी पिस्तूलधारी दरोडेखोराला पकडलं

dada bhuse
हातात पिस्तूल घेऊन दरोडा टाकण्यासाठी बंगल्यात घुसलेल्या दरोडेखोराला धाडस करुन पालकमंत्री दादा भुसे यांनी पकडले. मालेगावच्या कलेक्टर पट्टा भागात ही घटना घडली आहे.

लक्ष्मीपूजन असल्यामुळे बंगल्यात मोठ्या प्रमाणात दागिने, रोख रक्कम असेल ती लुटण्यासाठी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एक चोरटा हातात पिस्तूल घेऊन दोशी यांच्या बंगल्यात घुसला आणि त्याने घरातील महिलांना पिस्तूलचा धाक दाखवून दागिने मागितले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे महिलांमध्ये भीती पसरली आणि त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली.'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
 
त्यांचा आवाज ऐकून काही नागरिक गोळा झाले आणि त्याच भागात पालकमंत्री दादा भुसे देखील आलेले होते. त्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी थेट बंगल्याकडे धाव घेतली आणि चोरट्याला शरण येण्याचे आवाहन केले. तब्बल दोन तासानंतर लपलेला चोरटा शरण आला त्याला कार्यकर्त्यांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं.
 
Published By- Priya Dixit