गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 23 ऑक्टोबर 2022 (16:18 IST)

उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर

uddhav
यंदा सर्वत्र पावसाने उच्छाद मांडला होता, शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे पिकांचं खूप नुकसान झालं असून हातातोंडाशी आलेलं पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौरा करून औरंगाबादातील गंगापूर तालुक्यात नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर बोलून दाखवल्या. सरकारला शेतकऱ्यांच्या मदतीला भाग पाडू, धीर सोडू नका. असे आश्वासन त्यांनी दिले. 
 
राज्यात यंदा पावसाचा थैमान झाला असून सर्वात जास्त नुकसान मराठवाड्यात औरंगाबादातील गंगापूर तालुक्यात दहेगाव आणि पेंढापूर गावात झाले असून या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर गेले. शिंदे सरकार आल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. त्यांच्या दौऱ्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता. 
 
 Edited By - Priya Dixit