1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 23 ऑक्टोबर 2022 (11:29 IST)

मनसेनं भविष्यात शिंदे-फडणवीसांसोबत युती करायला हरकत नाही - राजू पाटील

pramod patil
मनसेनं भविष्यात शिंदे आणि फडणवीसांसोबत युती करायला हरकत नाही, असं वक्तव्य मनसे आमदार राजू पाटील यांनी केलं आहे. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा नाही का? राज ठाकरे यांचे आदेश आले तर नक्कीच युती करू, असंही राजू पाटील यावेळी म्हणाले.

पूर्वीच्या सरकारमध्ये आमची कुणी दखल घेत नव्हतं. शिवाय एखादी मागणी केली की ती कशी पूर्ण होणार नाही, याकडे लक्ष दिलं जायचं. पण शिंदे-फडणवीस सरकारकडून मात्र आमच्या मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक पावलं पडताना दिसत आहेत.
 
आमच्यासारख्या बाहेरून पाठिंबा असलेल्या पक्षांच्या मागण्या जर हे सरकार मान्य करत असेल, सकारात्मक प्रतिसाद देत असेल, तर जवळ येण्यास हरकत नाही, असं राजू पाटील यांनी म्हटलं.
Published By- Priya Dixit