1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (10:15 IST)

मुकेश अंबानींचे पुत्र अनंत अंबानी तब्बल तीन तास उद्धव ठाकरे यांच्या घरी

Anant Ambani
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे तीन दिग्गज नेते शिवाजी पार्कमधील मनसेच्या दीपोत्सवानिमित्त एकत्र आले असताना, दुसरीकडे, मातोश्रीवर मोठी घडामोड घडली.
 
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी मातोश्रीवर आले होते. अनंत अंबानी तब्बल तीन तासानंतर मातोश्रीवरुन बाहेर पडले. या भेटीचा तपशील समोर आलेला नाही. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.
 
मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर आले होते. यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. यांच्यात काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेले नाही.
 
रात्री 8 वाजून 20 मिनिटानी अनंत अंबानी यांना ताफा मातोश्री वर दाखल झाला. रात्री 11.30 वाजताच्या सुमारास अंबानी मातोश्रीवरुन बाहेर पडले.
 
Published By- Priya Dixit