गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (08:57 IST)

मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतले माजी मुख्यमंत्र्यांना चिमटे

uddhav shinde
नाशिक दौऱ्यात असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विविध कार्यक्रमात जोरदार चिमटे व टोमणे काढले. यावेळी उपस्थितांसह मुख्यमंत्री ना हसू आवरले नाही.

नाशिकरोड येथील सारथी कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी छत्रपती संभाजी राजे यांनी पुणे येथे सारथी कार्यालय थोडे डळमळीत झाले. त्यावेळी आम्ही आंदोलन केले त्यावेळी तत्कालीन नगरविकास मंत्री व आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी समज काढली. हा धागा पकडत मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळीही तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मला पाठवले व आरक्षणाच्या आंदोलना वेळी छत्रपती संभाजी राजे उपोषणाला बसले राज्य हादरले त्यावेळीही मलाच पाठवले.

कठीण व अडचणी वेळीही ते मलाच पाठवाचे. यामुळे माझे धाडस वाढले आणि तीन महिण्यापूर्वी मी धाडसी निर्णय घेतला. असे म्हणताच छत्रपती संभाजी राजे, मुख्यमंत्री व उपस्थितीना हसू आवरले नाही.
नाशिक साखर कारखाना येथील गळीत हंगाम प्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांनी अडीच वर्षे वर्क फॉम होम काम केले. मात्र, आम्ही रस्त्यावर उतरून काम करीत आहोत. त्यामुळे आम्हाला सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजल्या, असा टोमणा उद्धव ठाकरेंचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी लगावला.
 
नाशिक येथील कालिदास कालामंदिरात एका वृत्त वहिनीच्या पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी छत्रपती संभाजी राजे यांनी नाशिक हे पर्यटन स्थळ असून पर्यटक वाढले पाहिजे या करिता शासनाने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजे अशी मागणी करताच मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सरकार स्थापन करण्यापूर्वी आम्ही खुप पर्यटन केले, विविध राज्यात फिरलो, त्या धर्तीवर नाशिकच्या स्थळांना विकसित करू. असे म्हणताच व्यासपीठ व सभागृहात एकच हसा पिकली.
 
एकंदरीतच शुक्रवार च्या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंवर टोमणे बाजी करण्याची एकही संधी सोडली नाही.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor