1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 23 ऑक्टोबर 2022 (12:39 IST)

पुण्यात रेल्वेत चढताना तरुणाचा दुर्देवी मृत्यू

सध्या सर्वत्र दिवाळीसाठी जय्यत तयारी सुरु आहे. लोक दिवाळीसाठी आपापल्या गावी जाण्यासाठी बसने रेल्वेने प्रवास करत आहे. बस आणि रेल्वे स्थानकात लोकांची गर्दी ओसंडून वाहत आहे. पुण्याच्या रेल्वे स्थानकात दिवाळी साजरी करण्यासाठी रेल्वेतून प्रवास करण्यासाठी निघालेल्या एका तरुणाचा दारुण अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बौद्धा माजी उर्फ यादव(21) असे या मृतक तरुणाचे नाव आहे. गाडीची वाट पाहत असणाऱ्या या तरुणाची दिवाळीसाठी गावी जाण्याची इच्छा अपूर्ण राहिली.

पुणे दानापूर गाडीत चढण्याचा प्रयत्नात असलेल्या या तरुणाला खोकला आला आणि त्याचा श्वास गुदमरू लागला. त्याच्या नातेवाईकांनी त्याला बाजूला नेऊन स्थानकावर बसविले त्याची शुद्ध हरपली होती. पुणे स्थानकावरील डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांनी त्याला मृत घोषित केले. मयत तरुणाला मद्यपान आणि तंबाखू गुटख्याचे सेवन असल्याचे सांगितले जात आहे. मयत तरुण हा आजारी होता. 
 
Edited By - Priya Dixit