रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 जून 2023 (09:22 IST)

स्वतःच्या चितेची तयारी करुन आत्महत्या

suicide
Kolhapur News :कोल्हापूर जिल्ह्यातील वेतवडे गावात  स्वत:च्या चितेची तयारी करुन वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्याची दु:खद घटना समोर आली आहे. ही धक्कादायक मन सुन्न करणारी घटना घडली आहे.    
 
 महादेव पाटील आणि द्वारकाबाई पाटील अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आजारपणाला कंटाळून या दाम्पत्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. दाम्पत्याने गळफास घेऊन आपलं जीनव संपवलं आहे.  
 
 मात्र आपल्या मृत्यूनंतर कुणाला त्रास नको या हेतून दाम्पत्याने आत्महत्येपूर्वी या वृद्ध दाम्पत्याने चितेला लागणाऱ्या सर्व साहित्याची जमवाजमव करुन ठेवली. या घटनेनंतर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.