रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 एप्रिल 2023 (10:55 IST)

धक्कादायक, मुलीची हत्या करून बापाने गळफास लावून आत्महत्या केली

suicide
मुंबईतील लालबाग भागात एका पिताने आपल्या 11 वर्षाच्या मुलीची हत्या करून स्वतःला गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. भूपेश पवार (42) असे या मयत व्यक्तीचे नाव असून त्याच्याकडे चिट्ठी सापडली आहे. 

लालबागच्या गणेश गल्लीतील विमावाला महल इमारतीत राहणाऱ्या भूपेश ने घरात कोणी नसताना हे टोकाचे पाऊल घेतले. त्याने आधी आपल्या 11 वर्षाच्या मुलीला गळफास देऊन तिला मारून स्वतः गळफास घेतला.

आत्महत्यांचे कारण पती पत्नीच्या झालेले वाद आहे. सकाळी भुपेशचा पत्नीसह वाद झाला होता. पत्नी कामावर गेल्यानंतर त्याने घरात कोणी नसताना मुलीला गळफास देऊन तिची हत्या केली. नंतर स्वतःने गळफास लावली. पत्नीने दुपारी फोन केला असता भूपेश ने फोन उचलला नाही. त्याची पत्नी घरी गेली तर तिला दार आतून बंद असल्याचे आढळले. बऱ्याच वेळ दार ठोठवल्यानंतर देखील दार उघडले नाही तर पत्नीने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळी जाउन दार उघडल्यावर त्यांना भूपेष आणि मुलगी दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांना मयत भुपेशच्या हस्तलिखित चिट्ठी सापडली आहे.पोलिसांनी हत्या आणि अपघाती मृत्यूची नोंद करून मृतदेह ताब्यात घेतले आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
 
 
 
Edited by - Priya Dixit