1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (13:28 IST)

अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन तरुणाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तलवारीने सपासप वार

सातारा जिल्ह्यातील कराड याठिकाणी एका तरुणाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तलवारीने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन चौघांनी एकाच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून त्याच्यावर तलवारीने वार करुन व दांडक्याने बेदम मारहाण करुन त्याचा निर्घृण खून केला. 
 
करवडी ता. कराड गावच्या हद्दीत गावठाणापासून काही अंतरावर असलेल्या वाघेरी फाट्याजवळ ही घटना शनिवार, २५ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. खून झालेला युवक व संशयीत हे सर्वजण कोरेगाव तालुक्यातील आय गावचे रहिवासी आहेत. रमेश रामचंद्र पवार असं हत्या झालेल्या 40 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे.
 
नेमकं काय घडलं? 
२५ रोजी रात्रीच्या सुमारास रमेश जीपमधून आपल्या गावी जात असताना चार जणांनी रस्ता अडवून तरुणाला गाडीतून बाहेर खेचलं. तरुणाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तलवारीने सपासप वार केले गेले. गावातील एका महिलेसोबत मृत रमेश याचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणातून आरोपीने वाद घातला होता. 15 दिवसांपूर्वी वाद झाल्यानंतर हे प्रकरण मिटलं असं वाटत होतं. पण शनिवारी रात्री दहाच्या सुमारास चार जणांनी रमेश यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याच्यावर तलवारीने सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की काही क्षणातच रमेश रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळी पडला, यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 
 
याप्रकरणी दीपक शरद इंगळे आणि संदीप सुभाष इंगळे यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत रमेश आणि त्यांचा भाऊ नवनाथ दोघांचाही भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. 
 
याबाबदची फिर्याद नवनाथ रामचंद्र पवार वय ३६, रा. आर्वी, ता. कोरेगाव, जि. सातारा यांनी कराड ग्रामीण पोलिसात दिली आहे. फिर्यादीनुसार खून झालेला रमेश हा फिर्यादी नवनाथ याचा सख्खा भाऊ आहे. दोघेजण भाजीपाला विक्रीचा फिरून व्यवसाय करतात. गावातील दीपक इंगळे याचे व रमेश पवार यांचे १० ते १५ दिवसांपूर्वी भांडण झाले होते. नातेवाईक महिलेसोबत रमेश याचे अनैतिक संबंध असल्याचा दीपकला संशय होता. 
 
शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास रमेश हा गावातील लखन बालेखान मुलाणी याचे बोलेरो गाडीतून भाजीपाल्याचा माल आणण्यासाठी कराड मार्केट येथे आला होता. त्यावेळी त्याचेसोबत गावातील गाडीचालक लखन मुलाणी, अमर नेटके, दत्तात्रय पवार असे मित्र होते. त्यांनी कराडमध्ये भाजीपाला खरेदी करुन गाडीत भरला आणि नंतर रात्री दहाच्या सुमारास गायी आर्वी येथे जाण्यासाठी निघाले. 
 
कराड-पुसेसावळी रोडने जात असताना बाघेरी फाट्याजवळ पाठीमागून आलेल्या टवेरा गाडीने ओव्हरटेक करुन त्यांच्या बोलेरो गाडीच्या पुढे गाडी आडवली. टवेरा गाडीतून दीपक इंगळे, संदिप इंगळे व अनोळखी दोघे असे चौघे बाहेर आले. त्यांनी रमेशला गाडीतून बाहेर खेचलं आणि मिरचीपूड रमेशच्या डोळ्यात टाकली. त्यानंतर दीपकने तलवारसारख्या हत्याराने रमेशवर सपासप वार केले. संदिप व अन्य दोघांनी रमेशला दांडक्याने बेदम मारहाण केली. यामध्ये रमेश हा रक्ताच्या थारोळघात कोसळला.
 
नंतर आरोपी पळून गेले. घटनेनंतर रमेशला कराडमधील हॉस्पिटलमध्ये आणले गेले मात्र तो मृत असल्याचे जाहीर करण्यात आले, असे फिर्यादीत म्हटले आहे.