1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 डिसेंबर 2024 (15:24 IST)

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारवर केला हल्लाबोल

winter session day 1
महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. या वेळी विरोधकांनी राज्य सरकारवर गदारोळ करत हल्लाबोल केला. तसेच न्याय न मिळाल्यास मोठा मोर्चा काढणार असे म्हटले. 
विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच अनेक मुद्द्यावरून गदारोळ केला आणि अधिवेशनाच्या कामकाजाला रोखण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी विधानभवनाच्या बाहेर जोरदार निदर्शने केली.

आणि ईव्हीएमच्या वापरण्याच्या विरोधात घोषणाबाजी केली. आज नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अंबादास दानवे यांच्या नेत्तृत्वाखाली एमव्हीएच्या नेत्यांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली. त्यांनी ईव्हीएमचा वापर  करण्याचा विरोध केला आणि लोकशाही वाचवण्याचे आवाहन केले. 

ईव्हीएम हटवा आणि देशाला वाचावा, ईव्हीएम काढा संविधान वाचवा.ईव्हीएम हटवा लोकशाही वाचवा अशा घोषणा दिल्या. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, भाई जगताप, विकास ठाकरे.सचिन अहिर आमदार जितेंद्र आव्हाड हे अंबादास दानवे यांच्या सोबत निदर्शनामध्ये हजर होते. 

अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना ईव्हीएम लोकशाहीसाठी धोकादायक असून निवडणुकीत ईव्हीएमचा वापर करण्याचा लोकांचा विरोध असल्याचा दावा केला. ईव्हीएम काढून बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घ्याव्यात," असे शिवसेना (यूबीटी) नेते म्हणाले.
Edited By - Priya Dixit