गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (23:50 IST)

ऋषिकेश -बद्रीनाथ मार्गावर मुंबईच्या भाविकांवर काळाची झडप, कार दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू

On the Rishikesh-Badrinath route
Rishikesh Car Accident : ऋषिकेश बद्रीनाथ मार्गावर ब्रह्मपुरी जवळ काळाने झडप घातली आणि कार अपघातात चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. हे भाविक दहिसर, कोळीवाडा, वसई , पालघर आणि ठाण्याचे रहिवाशी होते आणि बद्रीनाथ दर्शनासाठी निघाले असताना कारचा अपघात होऊन कार दरीत कोसळली. कार मध्ये 5 प्रवाशी होते. ब्रह्मपुरी जवळ कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटून कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू झाला तर एकाच उपचारा दरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. शिवाजी बाबर बुधकर, पुरुषोत्तम दत्तात्रेय खिलकूटी, जितेंद्र प्रकाश लोखंडे आणि धर्मराज नारायण असे मृतांची नावे आहेत. तर रवींद्र महादेव चव्हाण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना ऋषिकेशच्या एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत.