संबंधित माहिती
- हळद व्यापाऱ्याने आणखी १२ शेतकऱ्यांची १२ लाख ८३ हजार ८९७ रुपयांची फसवणूक
- Vastu Tips: जर तुम्ही घरात अशा जागी टीव्ही लावला असेल तर तो लगेच काढून टाका, होऊ शकते मोठे नुकसान
- 8000 हून अधिक वाहनांची चोरी, 181 गुन्हे; भारतातील सर्वात मोठा वाहन चोर पकडला
- Rahul Gandhi in Gujarat: शेतकऱ्यांची कर्जमाफी, सिलिंडर आणि 500 रुपयांची मोफत वीज..काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मोठ्या घोषणा
- कर्णधारपद सोडल्यानंतर कोहली एकटा पडला, दुःखात फक्त धोनीने साथ दिली, मोठा खुलासा
Big announcement for farmersशेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
राज्यातील शेतकर्यांसाठी गोड बातमी समोर आली आहे. शेती व फळबागांचे नुकसान झाले असल्याने सरकारने 1 हजार 8 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. शेतकऱ्यांना 3501 कोटी नुकसान भरपाई. सोमवारपासून ही मदत बँक खात्यात जाणार आहे.
मराठवाड्यासह राज्याला खरीप हंगामात यंदा अतिवृष्टी आणि पूराचा फटका बसला. यात जुलैमध्ये 5 लाख 87 हजार 466.41 तर ऑगस्टमध्ये 1 लाख 40 हजार 331.44 असे 7 लाख 36 हजार 133.38 हेक्टर जिरायती व फळबाग क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले. या नुकसान भरपाईसाठी शासनाने गुरुवारी सायंकाळी 1 हजार 8 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
